पिंपरी (Pclive7.com):- देशभरात आकर्षण ठरणाऱ्या प्रो कबड्डी स्पर्धेसाठी यु मुंबा संघात भोसरीच्या विराज लांडगे याची निवड झाली आहे. निवड समितीने नुकतीच ही निवड केली आहे. विराज या आधी राष्ट्रीय स्तरावरील विविध कबड्डी स्पर्धांमध्ये खेळला असून सुवर्णपदक देखील पटकाविले आहे. आगामी प्रो कबड्डी स्पर्धेत यु मुंबा कबड्डीतून डावा मध्यरक्षक म्हणून खेळताना दिसणार आहे.

भोसरीतील भैरवनाथ कबड्डी संघातून २००५ पासून विराजने कबड्डी खेळायला सुरूवात केली आहे. २०११ रोजी मलेशिया येथे ज्यूनियर एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडल्या. यामध्ये विराजने सहभाग घेत सुवर्णपदक पटकाविले होते. या बरोबरच २०१५ ते १८ या कालावधीत राष्ट्रीय पातळीवरील सिनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेत देखील सहभाग घेतला होता.
२०१८ मध्ये हैद्राबाद येथे झालेल्या सीनिअर चॅम्पीयनशिप स्पर्धेत भारताच्या कबड्डी संघाने ११ वर्षानंतर सुवर्णपदक पटकाविले होते. या संघात विराज लांडगे याने देखील प्रतिनिधित्त्व केले होते. विराज सध्या मध्य रेल्वे संघात टीसी पदावर कार्यरत आहे. इंडियन रेल्वेच्या नॅशनल संघात देखील २ वेळा खेळण्याची संधी विराजला प्राप्त झाली. प्रो कबड्डी लीगमध्ये चार सीजन खेळल्यानंतर यंदाच्या वर्षी यू मुंबामधून विराज खेळणार आहे.
Tags: निवडपिंपरी चिंचवडप्रो कबड्डी स्पर्धाभोसरीयू मुंबा कबड्डी संघयू मुंबा कबड्डी संघात भोसरीतील विराज लांडगे याची निवडविराज लांडगे






















Join Our Whatsapp Group