पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन व जिज्ञासा वाढीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी (दि.२५) दुपारी ४ ते ५.३० या वेळात खंडग्रास सूर्यग्रहण दुर्बिणीला विशेष सोलर फिल्टर लावून पाहता येणार आहे. १ आणि २ नोव्हेंबरला रोबोट आणि गंमतीशीर विज्ञान गणितावर आधारित कार्यशाळा दोन बॅचेसमध्ये घेतल्या जाणार आहेत. याशिवाय, ८ नोव्हेंबरचे खग्रास चंद्रग्रहण दुर्बिणीद्वारे पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाग घ्यावा. कार्यशाळेसाठी नावनोंदणी सायन्स पार्क कार्यालयात करता येईल. अधिक माहितीसाठी या ई-मेल वर [email protected] वर संपर्क करावा, असे आवाहन सायन्स पार्ककडून करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group