आळंदी (Pclive7.com):- गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी व तायक्वोंदो खेळामध्ये देवाची आळंदी येथील ज्ञानगंगा इंग्लिश मेडियम स्कूलला घवघवीत यश मिळाले आहे.
स्कूल मधील आदित्य राहनडाळे, यश जाधव, अखिल देशमुख, अभिनव यादव, गौरव वाघ, अजित साळुंके, पृथ्वेश सोनवणे, प्रेम जोंधळे, यांनी सुवर्णपदक मिळवले. तसेच तायक्वोंदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व खेळाडूंना आळंदीतील ज्ञानगंगा इंग्लिश मेडियम स्कूलचे प्राचार्य विजय गुळवे सर व क्रीडा शिक्षक प्रेम श्रृगांरे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे ज्ञानगंगा इंग्लिश मेडियम स्कूल आणि सौ. प्रतिक्षा अमोल कापसे (चिंचवडगाव) व सर्व देवाची आळंदीकरांनी अभिनंदन केले.