पिंपरी (Pclive7.com):- संभाजीनगर येथील संघर्ष मित्र मंडळाला तहसीलदार अभिजीत जगताप यांनी (दि.२७) भेट दिली. यावेळी त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी आरंभ सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. सोनालीताई हिंगे, उद्योजक अशोकशेठ आखाडे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र छाबडा यांच्यासह सुमारे तीन हजार भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादचा लाभ घेतला.

या प्रसंगी पाऊस सुरू असताना देखील परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. या कार्यक्रमाचे आयोजन विक्रम जानुगडे, पवन येसादे, अमित देशमुख, मयुर सकपाळ, प्रशांत हाडोळे, संकेत किरपे, निलेश टेमकर, आकाश पिंजरकर, ओंकार पारिसकर, सचिन हाडोळे आदींनी यशस्वीपणे केले.
Tags: Pcmc news




















Join Our Whatsapp Group