पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव येथे काम करीत असताना अकराव्या मजल्यावरून पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.३) दुपारी थेरगाव येथे घडली. राम नरेश यादव (वय ४१, रा. वाकड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम यादव हे मंगळवारी थेरगाव येथील सिव्हर क्रिस्टल या इमारतीच्या अकराव्या मजल्यावर काम करीत होते. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांचा तोल गेल्याने ते खाली डक्टमध्ये पडले.
जखमी झालेल्या यादव यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
Tags: Pcmc news






















Join Our Whatsapp Group