पिंपरी (Pclive7.com):- गहुंजे येथे सोमवारी (दि.३०) विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२३ मधील श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान हा एकदिवसीय क्रिकेट सामना पार पडणार आहे. हा सामना पाहण्याकरीता खाजगी वाहनांनी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येतात यावेळी परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाहतूकीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पार्किंग व्यवस्था कोठे व कशी असेल याबाबतही सांगण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबतचे आदेश आज (दि.२८) काढले आहेत.
हा बदल तात्पुरर्ता असून पुढीलप्रमाणे असेल –
१) मुंबई कडून येणारी वाहने –
देहुरोड वाहतूक विभाग –
अ) उसे टोलनाका किवळे ब्रिज पुर्वी ५०० मी अंतरावरून डावीकडे वळून पुन्हा डावीकडे यु टर्न घेवून मागुड़ी अंडरपासचे उजव्या बाजूने कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंगकडे जातील..
ब) उसे टोल नाका किवळे ब्रिज उतरुन मुकाई चौक उजये बाजूने किवळे ब्रिज खालून कृष्णा हॉटेल शेजारून मामुर्डी अंडरपासचे डाव्या बाजूने अथवा एमएच ०४ बोगद्यातून डावीकडे वळून मामुर्डी अंडरपासचे उजव्या दिशेने कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंग कडे जातील.
क) सोमाटणे फाटा ते सेंट्रल चौक देहूरोड ते मामूर्डी- शितळादेवी अंडरपास कडे डावीकडे वळून यु टर्न घेवून अंडरपासने पुन्हा डावीकडे वळून लेखा फार्ममार्गे मामुर्डी अंडरपासचे उजव्या बाजूने कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंग कडे जातील.
ड) सेंट्रल चौक ते मुकाई चौकातून उजव्या बाजूने किवळे ब्रिज खालून कृष्णा हॉटेल शेजारून मामुर्डी अंडरपासचे डाव्या बाजूने अथवा एमएच ०४ बोगद्यातून डावीकडे वळून मामुर्डी अंडर पासचे उजव्या दिशेने कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंगकडे जातील.
२) पुण्याकडून येणारी वाहने-
अ) किवळे ब्रिजचे पूर्वी डाव्या बाजूने सर्विस रोडवरून कृष्णा हॉटेल शेजारून मामुर्डी अंडरपासचे डाव्या बाजूने अथवा एमएच ०४ चोगद्यातून डावीकडे वळून मामूर्डी अंडरपासचे उजव्या दिर्शन कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंगकडे जातील.
ब) पुणे बाजूकडून येणारी वाहणे किवळे ब्रिज उतरल्यावर लगेच डावीकडे वळून मामुर्डी अंडरपासचे उजवे बाजूने कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंगकडे जातील.
३) सामना संपल्यानंतर कानेटकर बंगला ते साईनगर परिसरातील पार्किंगमधील वाहने साईनगर- सेंट्रल चौक मार्गाने इच्छितस्थळी जातील.
टिप : सेंट्रल चौक साईनगर मार्गे कानेटकर बंगला चौककडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनास बंदी असेल. तसेच मैदानाकडे प्रेक्षक येताना व सामना संपल्यावर परत जाताना त्याचे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना मज्जाव असेल.