पिंपरी (Pclive7.com):- कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बदनामी करण्याच्या हेतूने बेताल व्यक्तव्य केल्याप्रसंगी अनेकांचे मन दुखावल्याचे निदर्शनास आले असल्याने पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने आज पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष मा.तुषार हिंगे, अजित कुलथे, दीपक नागरगोजे, सतीश नागरगोजे, गणेश संभेराव, सुधीर साळुंखे, सचिन बंदी, उमेश सांडभोर, युवराज ढोरे, सनी बारणे, गौरव शिरोदे, अनिकेत शेलार, मोहन राऊत, प्रिया पवार, यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group