पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये गुलेन बॅरि सिंड्रोममुळे (जीबीएस) ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये ही जीबीएसमुळे हा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी ही माहिती दिली आहे.

पिंपळे गुरव भागात राहणारा हा तरुण ओला-उबेरचा चालक असून तो २१ जानेवारीला वायसीएम रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र त्याची तब्येत खालावलेली होती, त्यामुळं पहिल्याच दिवशी त्याला व्हेंटिलेटरवर घ्यावे लागले होते. तो ओला-उबेर चालक असल्याने त्याने कोणत्या परिसरातील पाणी प्यायल्याने त्याला जीबीएसची लागण झाली, याचा शोध लागत नाही.
याबाबत वैद्यकीय विभागाचे अधिकारी प्रमुख डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी म्हटले आहे की, वायसीएम रुग्णालयाच्या ऑडिट रिपोर्ट नुसार या रुग्णाला जीबीएसची लागण झाली होती. तो पिंपळे गुरव मध्ये राहत असून ओला उबेरचा चालक होता. हा रुग्ण वायसीएममध्ये दाखल झाला तेव्हा त्याला ताप, खोकला आणि प्रचंड अशक्तपणा होता. त्यामुळे ऍडमिट होताच त्याला व्हेंटिलेटरवर घेण्यात आले होते. दहा दिवस या रुग्णाला एक्सपोर्टच्या सल्ल्यानुसार उपचार केले होते. मात्र रुग्णाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तो ओला- उबेरचा चालक होता. संपूर्ण पुणे जिल्ह्यात त्याला फिरावं लागत होते. घरच्यांनी माहिती दिल्यानुसार तो सकाळी डबा घेऊन बाहेर पडायचा ते रात्रीच घरी येत असे. त्यामुळे दिवसभर नेमके त्यांनी कुठे अशुद्ध पाणी प्याले हे शोधणे अवघड आहे. महापालिकेने पिंपळे गुरव येथील त्याच्या घराच्या परिसरातील पाण्याची तपासणी केली, मात्र ते पाणी पिण्या योग्य असल्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागाकडून आला आहे.






















Join Our Whatsapp Group