पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी काल पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज पक्षात मोठा भूकंप झालायं. संपूर्ण शहर कार्यकारिणीने आजच्या बैठकीत सामुदायिक राजीनामे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सादर केलेत.
महिला प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, सेवादलाचे मुख्य संघटक संग्राम तावडे, प्रदेश एस.सी विभागाचे उपाध्यक्ष गौतम आरगडे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, किशोर नेवाळे, लक्ष्मण रूपनार, बाळासाहेब साळुंके, परशुराम गुंजाळ, राजेंद्रसिंग वालिया, बिंदू तिवारी, विशाल कसबे, मयुर जैस्वाल, सज्जी वर्की या पदाधिकाऱ्यांनी आज प्रदेशाध्यक्षांकडे आपले सामुदायिक राजीनामे दिले आहेत.






















Join Our Whatsapp Group