पिंपरी (Pclive7.com):- धनगर समाजाचा आरक्षण प्रश्न सोडवण्याच्या अंतिम टप्प्यात सरकार पोहचले आहे आणि लवकरच हा प्रश्न यशस्वीरित्या सोडविण्यात सरकारला निश्चित यश येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमधील धनगर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
चापेकर संग्रहालयाच्या भूमीपूजनानिमित्त मुख्यमंत्री पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी शहरातील तमाम धनगर समाज बांधवांच्या तर्फे त्यांना धनगर आरक्षणाबाबतचे निवेदन पिंपरी चिंचवड शहर धनगर समाज महासंघाच्या वतीने देण्यात आले. या निवेदना मार्फत धनगरांच्या आरक्षण या विषयातील गांभीर्य सरकारने ओळखावे आणि धनगड व धनगर हा फरक नसुन आरक्षण टाळण्यासाठी जाणुन बुजून पाडलेली एकाच समाजाची दोन नावे आहेत. मुळात धनगड ही जातच अस्तित्वात नसतांना बळेच धनगरांना या ड आणि र च्या उच्चार खेळीत खेळवले जात आहे. या आधीच्या सरकारने हेच करुन समाजास वेठीस धरले, म्हणुन समाजाने यावेळच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला दुर ठेऊन भाजपाला साथ दिली. आज मुख्यमंत्री म्हणुन या समाजाला न्याय देणे हे आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. त्यासाठी आपण सनदशील मार्गाने प्रयत्न करुन आगामी निवडणुकी आगोदर महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांना समाजाचे आरक्षण जाहीर करुन न्याय मिळवुन द्यावा. आणि या ही निवडणुकीत महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला आपल्या सरकारच्या मागे ठाम उभे राहण्यास प्रवृत्त करावे अशी विनंती मुख्यमंत्री यांना करण्यात आली. त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांचे पिंपरी चिंचवड शहरातील तमाम धनगर बांधवांकडुन शहरात आल्या बद्दल सहर्ष स्वागत देखील करण्यात आले.
हे निवेदन देण्यासाठी गेलेल्या धनगर समाजातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले धनगर समाजाचा आरक्षण प्रश्न सोडवण्याच्या अंतिम टप्प्यात सरकार पोहचले आहे आणि लवकरच हा प्रश्न यशस्वीरीत्या सोडविण्यात सरकारला निश्चित यश येईल. आम्ही तुमच्या निवेदनाचा आदर राखुन धनगर समाजास न्याय देण्याचा पुर्णपणे प्रयत्न करु आशा प्रकारचे आश्वासनही दिले. मुख्यमंत्री यांना हे निवेदन देण्याकरिता पिंपरी चिंचवड शहर धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष राजू दुर्गे, अशोक खरात, श्रीकांत धनगर, वीणा सोनवलकर, राजेंद्र घोडके, शिवाजी आवारे, संतोष बिचुकले, दादा दोलतोडे, यशवंत होळकर, राजेश पवार आदी कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ गेले होते.






















Join Our Whatsapp Group