
तुकाई माता हाऊसिंग सोसायटी, आरंभ मित्र मंडळ आणि गंगोत्री पार्क मित्र मंडळाचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
भोसरी (Pclive7.com):- गवळीनगर प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपा आरपीआय (आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार जालिंदर शिंदे, सागर गवळी, अनुराधाताई गोफणे, कविताताई भोंगाळे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. होम टू होम प्रचार, पदयात्रा, रॅली, कोपरासभांमधून मतदारांशी संवाद साधत सर्वच उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ तुकाई माता हाऊसिंग सोसायटी, आरंभ मित्र मंडळ तसेच गंगोत्री पार्क मित्र मंडळ यांचा संयुक्त स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ५ गवळीनगर भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या दैनंदिन समस्या, नागरी सुविधा, विकासकामांबाबतच्या अपेक्षा व सूचना जाणून घेतल्या. नागरिकांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास यावेळी दिला.

यावेळी आमदार मा. श्री. महेशदादा लांडगे यांचे बंधू श्री. कार्तिक सर लांडगे, कुंडलिक शेठ लांडगे, सतीश मामा गवळी, चंदू शिंदे, पिटू देवरे, बाबा पांडे उपस्थित होते. स्नेहमेळाव्यास उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले.






















Join Our Whatsapp Group