पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळांच्या भेटी घेतल्या. महापालिकेतील सत्ता गेल्यामुळे काहीसे नाराज झालेले अजितदादांनी या शहरावर पुन्हा एकप्रकारे आपला हक्क दाखविण्यास सुरू केली असून त्यांचा आजच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीत चांगलाच उत्साह संचारला आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा काही महिन्यावरच येऊन ठेपल्यामुळे सर्वत्र निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा आजचा पिंपरी चिंचवड शहरातील दौरा महत्वपूर्ण ठरला आहे. शहरात पहिल्यादाच भाजपाची सत्ता आलीय. कारभारी पालकमंत्री गिरीश बापट एकीकडे शहरात विशेष करून फिरकत नसल्याचे चित्र आहे. तर पुर्वीचे कारभारी अजितदादा यांनी शहरावर आजही तेवढेच प्रेम असल्याचे दाखवून दिले. अजितदादांनी आज (शनिवारी) पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळांना भेटी दिल्या. दापोडी येथून दुपारी तीन वाजता पवार यांनी गणेश मंडळाच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर भोसरी, चिखली, चिंचवड, निगडी, आकुर्डीगाव, चिंचवडगाव, रहाटणी पिंपळेसौदागर, वाकड परिसरातील अशा ३० गणेश मंडळांना पवार यांनी भेटी दिल्या.
शहरात सत्तेत असलेल्या भाजपाचे वरिष्ठ नेते विशेष करून शहरात फिरकत नसल्याचे चित्र असताना अजित पवार यांनी आजही शहरावर प्रेम असल्याचे दाखवून दिले. मंडळांना भेटी दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून आगामी काळात राष्ट्रवादीची ताकद वाढण्यास पवारांच्या या दौऱ्यामुळे फायदा होणार आहे.






















Join Our Whatsapp Group