निगडी (Pclive7.com):- निवडणूक आयोगातील भाजप-धार्जीने धोरण आणि मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या एकाधिकार शाहीच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसने आज निगडी येथील अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर मत चोरी देशद्रोही निषेध आंदोलन केले.

नुकतीच संपूर्ण देशात खळबळ उडवून टाकलेल्या निवडणूक आयोगातील गलथान अनाधिकृत आणि घोटाळ्याच्या घटनेने जन मतावर – विश्वासावर आणि लोकशाहीवर मोठा घाला घातला आहे. भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या दरम्यान आयोगाच्या कारभाराबाबत पारदर्शकता आणि अविश्वासाचे वातावरण असल्याचे इंडियन एक्सप्रेस या दैनिकात प्रसिद्ध झाले होते. यात गेल्या 10 महिन्यात वरील दोन निवडणूक आयुक्तांनी किमान 14 वेळा ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयावर अधिकृतपणे आक्षेप नोंदवले आहेत ते मतदार यादी विशेष सखोल पुनर्परीक्षण प्रक्रिया बाबत, मतदारांच्या अनधिकृत केलेल्या नावे नोंदणी, नावे वगळणे आणि आयोगाच्या आयटी प्रणालीचे केंद्रीकरण याबाबत होते.

या सर्व बाबींवर देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सातत्याने निवडणूक आयोगाची पोलखोल पुराव्यासहित केली होती, इंडियन एक्सप्रेसच्या बातमीने यावर शिक्कामार्फ केले आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची कृती देशद्रोहाची आहे त्यांनी संविधानिक मूल्य पायदळी तुडविली आहेत लोकशाहीची हत्या केली आहे याबाबत काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांची बरखास्ती, अटक तसेच त्यांच्या काळातील सर्व निर्णयांची पडताळणी, निवडणूक आयोगाचे काम मार्गदर्शक आणि निष्पक्षपणे पुन्हा सुरू करणे याबाबतीमध्ये मागणी करत जोरदार निदर्शने आंदोलन केले. याबाबत अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांना काँग्रेसकडून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “भाजपा धार्जिण्या निवडणूक मुख्य आयुक्तांना तात्काळ बडतर्फ करत अटक केली पाहिजे, लोकशाहीच्या महत्त्वाच्या स्तंभाला मोडकळीस आणणाऱ्या अशा व्यक्तीच्या विरोधात लोकशाहीच्या दुसऱ्या स्तंभाच्या एका संशोधक पत्रकार महिलेने मोलाची कामगिरी केली आहे, देशाचे नेते राहुलजी गांधी यांनी आजवर केलेले सर्व आरोप तंतोतंत खरे ठरले आहेत, भाजपा मागील निवडणुका सुद्धा हरलेली आहे मात्र निवडणूक आयोगाला सोबत धरून घोटाळे करत निवडणुकांचे निकाल बदलण्यात आले हे आता सरळ स्पष्ट झाले आहे,आता जनता रस्त्यावर उतरेल, भाजपचा अंत जवळच आहे.”

याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अशोक मोरे, पुरोगामी, सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते मानव कांबळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ओबीसी संघर्ष समितीचे विशाल जाधव, विचार विभागाचे युवक प्रदेशाध्यक्ष राहुल शिंपले, भीमशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष सुरज गायकवाड, पुणे जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, शहर उपाध्यक्ष सोपानराव माने, रवी भोसकर, वीरेंद्र गायकवाड, संदीप शिंदे, स्वाती शिंदे, अश्विनी पाटील, गौरी नरसिंगे, आशा भोसले, रितिका शर्मा, हरीश डोळस, हिराचंद जाधव, सूरज माने, देवदत्त रानवडे, मेहबूब इनामदार, दिग्विजय मोहिते, नबीलाल मुल्ला, विल्यम साळवी, प्रदीप शर्मा, कबीर मोहम्मद, पुरुषोत्तम राऊत, नितीन सोनवणे, गौतम सरपाते, डेनिस देवनसन,अमरसिंग पोथिवाल, फिरोज तांबोळी, भास्कर नारखेडे, गुंगा क्षीरसागर, संगमेश्वर गंगापुरे, कृष्णा जाधव, संदेश जगताप, रामकिसन माने, राजू भाई परदेशी, जितेंद्र छाबडा, दीपक जाधव, प्रवीण कांबळे, आलोक लाड, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.


















Join Our Whatsapp Group