पिंपरी (Pclive7.com):- वर्षानुवर्षे निष्ठा, शिस्त आणि कर्तव्यभावनेने शहराची सेवा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका भक्कम पायावर उभी आहे, अशा शब्दांत सह आयुक्त मनोज लोणकर यांनी सेवानिवृत्तांच्या कार्याचा गौरव केला.

महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकर पवळे सभागृहात आयोजित सोहळ्यात सप्टेंबर २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले १९ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेले २ असे एकूण २१ अधिकारी व कर्मचारी यांचा सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होत्या.
कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह मुख्य लिपिक माया वाकडे तसेच नंदकुमार इंदलकर विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
माहे सप्टेंबर २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये उपअभियंता गणेश राऊत, कार्यालय अधीक्षक रमेश यादव, मुख्याध्यापक पुष्पा शिंदे, रजनी आहेर, अनुजा सोनगरे, मुख्य लिपिक रामू गेंगजे, रोहिणी ढेंबरे, सिस्टर इनचार्ज पौर्णिमा आमले, जलधारा टिपले, कॉम्प्युटर ऑपरेटर अरुण गुंडगळ, उपशिक्षक नीलिमा भांबेरे, सुनिता शेजवळ, रखवालदार बाळू लांडगे, लिफ्टमन विलास गायकवाड, मजूर हंसराज सजनियाल, लक्ष्मण मानमोडे, पांडुरंग गवारी, सफाई कामगार सविता काळभोर आणि नंदकुमार भोंडवे यांचा समावेश आहे.

तर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्यांमध्ये सफाई कामगार राजेश गंगावणे आणि कचरा कुली गणेश यादव यांचा समावेश आहे. सेवानिवृत्तांच्या योगदानाबद्दल या सोहळ्यात कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.



















Join Our Whatsapp Group