राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईत गौरव; पिंपरी-चिंचवड पोलीस दलासाठी अभिमानाचा क्षण
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना उल्लेखनीय प्रशासकीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (President’s Police Medal – PPM) प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) मुंबईतील लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये आयोजित पदक अलंकरण समारंभात त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले.

राष्ट्रपती महोदयांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी विनय कुमार चौबे यांना प्रशासकीय सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले होते. त्यानुसार आज आयोजित समारंभात त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले.

विनय कुमार चौबे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय कार्याची, कर्तव्यनिष्ठेची आणि सेवाभावी वृत्तीची पावती मानला जात आहे. त्यांच्या या गौरवामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीही ही अभिमानाची बाब ठरली आहे.


















Join Our Whatsapp Group