पिंपरी (Pclive7.com):- उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला मिळवला. त्या दाखल्याच्या आधारे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पीएमआरडीए कडून फ्लॅट मिळवत शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना २१ मे २०२१ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत व्याघ्रगड सहकारी गृहनिर्माण संस्था, सेक्टर नं. १२, भोसरी येथे घडली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अशोक भोगल यांनी गुरुवारी (दि. ८ ऑक्टोबर) रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद दानिश अब्दुल माजिद शेख (वय ४५, रा. भोसरी, पुणे), त्याची पत्नी आणि एजंट इरफान शेख (रा. खराळवाडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद दानिशचा जन्म उत्तर प्रदेशात झालेला असताना त्याने खडकी येथील ज्युनिअर कॉलेजचा शाळा सोडल्याचा बनावट दाखला आणि वडिलांचा शाळा निर्गम उतारा एजंटमार्फत बनवून घेतला. या बनावट कागदपत्रांच्या आधारे हवेली तहसील कार्यालयातून महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला मिळवला. या दाखल्याचा वापर करून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पीएमआरडीए कडून व्याघ्रगड सोसायटीतील फ्लॅट नंबर ९०४ स्वतःच्या नावावर करून शासनाची फसवणूक केली.

















Join Our Whatsapp Group