DICE उपक्रमांतर्गत JSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला शैक्षणिक क्षेत्रभेट; ४० विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग
थेरगाव (Pclive7.com):- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, नवोपक्रम आणि उद्योजकीय विचार विकसित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या DICE (Developing Innovation Culture and Entrepreneurship) उपक्रमांतर्गत पीएम श्री माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथील विद्यार्थ्यांसाठी JSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ताथवडे येथे शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. या क्षेत्रभेटीत एकूण ४० विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील इनक्युबेशन सेंटर, रोबोटिक्स लॅब, मॅक लॅब, आयडिएशन लॅब तसेच VMC/CNC मशीन सेंटरला भेट दिली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, संशोधन आणि नवकल्पनांच्या विश्वाची प्रत्यक्ष ओळख झाली. विविध प्रयोगशाळांमधील उपकरणे आणि तांत्रिक प्रक्रियांची माहिती घेताना विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने सहभाग नोंदवला.

‘आयडिया क्रिएशन’ विषयावर मार्गदर्शन..
क्षेत्रभेटीदरम्यान JSPM कॉलेजचे प्रा. डॉ. सचिन आर्गडे यांनी विद्यार्थ्यांना ‘आयडिया क्रिएशन’ या विषयावर मार्गदर्शन केले. नवीन कल्पना कशा सुचवाव्यात, त्यांना नावीन्यपूर्ण स्वरूप कसे द्यावे आणि त्या कल्पनांचे प्रत्यक्ष उपयोगात रूपांतर कसे करता येते, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी JSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ताथवडेचे संचालक डॉ. अविनाश बदादे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नवकल्पना, संशोधन, उद्योजकता आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित केले.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव..
या शैक्षणिक क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि उद्योजकीय विचार विकसित करण्यासाठी ही भेट उपयुक्त ठरली. विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी अनुभव ठरला.
या क्षेत्रभेटीचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब राठोड आणि प्रकल्प समन्वयक श्रीमती दीपाली मगदूम यांच्या विशेष प्रयत्नांतून करण्यात आले. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. नामदेव कोकणे, श्रीमती हर्षदा राऊत, सहकारी शिक्षक श्री. बालाजी जगताप, श्रीमती स्नेहल भोसले तसेच JSPM कॉलेजच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


















Join Our Whatsapp Group