वाकड (Pclive7.com) : वाकड पोलीस चौकीजवळील कॅपिटल टॉवर सोसायटीमधील एका फ्लॅटला आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच भाजपचे शहर उपाध्यक्ष रामभाऊ वाकडकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. आगीत अडकलेल्या नागरिकांना अग्निशमन दलच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांनी स्वतः रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रामभाऊ वाकडकर यांनी तातडीने अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सेवेला पाचारण केले. संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत त्यांनी मदतकार्याला गती दिली. संकटाच्या प्रसंगी दाखवलेल्या या तत्परतेमुळे जखमी नागरिकांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास मदत झाली.

या दुर्घटनेत काही नागरिक आगीत अडकलेल्यांना त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
संकटाच्या काळात नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याची सामाजिक बांधिलकी रामभाऊ वाकडकर यांनी दाखवलेल्या तत्परतेतून अधोरेखित झाली. आपत्कालीन परिस्थितीत वेळेत मदत उपलब्ध करून देणे आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून स्पष्ट झाले.


















Join Our Whatsapp Group