
कलाटे कुटुंबीयांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली भेट
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज (दि.१३) कलाटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच या प्रकरणातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप हे देखील उपस्थित होते.

यावेळी हुंडाबळीच्या वाढत्या घटनांबद्दल रहाटकर यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. समाजात हुंडाबळी विरोधात जनजागृती होत असतानाही अशा घटना घडत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथांमुळे महिलांचे आयुष्य धोक्यात येत असेल, तर समाज नेमका कोणत्या दिशेने जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शिल्पा गवारे प्रकरणातील आरोपींना अद्याप जामीन मंजूर झालेला नसल्याची माहिती देत, या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे रहाटकर यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणाचा तपास पुढे नेऊन लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहितीही त्यांनी दिली.


















Join Our Whatsapp Group