पिंपरी (Pclive7.com):- नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे आणि नगरसेविका निर्मलाताई कुटे यांनी पुन्हा एक पाऊल ‘स्मार्ट सिटी’कडे वळवत ‘ग्रीन सौदागर’ क्लिन सौदागर हा ध्यास मनात घेऊन प्रथमच पिंपळे सौदागर येथे हिरो कंपनीची लीप ‘इ-स्कुटर’ सेवा आज पासुन कार्यरत करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी प्रथम टप्यात ट्रायल बेसेसवर २० ‘इ-स्कुटर’चे नियोजन करण्यात आले होते. आज शिव छत्रपती शिवाजी महाराज लिनियर अर्बन गार्डन येथे या ‘इ-स्कूटर’चे उद्घाटन चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
ही ‘इ-स्कुटर’ Android App द्वारे चालु किंवा बंद करता येते. ही स्कुटर इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे एकदा फुल्ल चार्ज केल्यावर ६० किलो मिटर चालवता येते. ह्या ‘इ-स्कुटर’ला चार्जिंगसाठी ४ ते ५ तास लागतात. ‘इ-स्कुटर’ची टॉप स्पीड ही २५ किलो मिटर प्रति तास आहे.
वाढती महागाई आणि वाढते प्रदुषणाला आळा घालण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मलाताई कुटे यांनी हि संकल्पना प्रथमच पिंपळे सौदागर रहिवाशीयांसाठी ‘इ-स्कुटर’ ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
‘इ-स्कुटर’ चालवण्यासाठी पाहिले १५ मिनीट राईड फ्री असणार आहे. त्यानंतर ‘इ-स्कुटर’ चालवण्यासाठी १.५० रुपये पर मिनिट आहे. पैसे पेड करण्यासाठी UPI अप्स द्वारे पैसे पेड करून इ-स्कुटरचा आनंद नागरिकांना घेता येईल.
नगरसेवक शत्रुघ्न(बापु) काटे आणि नगरसेविका निर्मलाताई कुटे यांनी पिंपळे सौदागर मधील नागरिकांच्या स्वास्थ व आरोग्याची काळजी घेत अनेक ठिकाणी पेडल सायकल पॉईंट केले आहेत. त्याच ठिकाणी या ‘इ-स्कुटर’ पॉईंट आणि ‘इ-स्कुटर’ चार्जिंग पॉईंट असल्याचे नियोजन केले आहे.
यावेळी पवना सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन जयनाथशेठ काटे, उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, चंदाताई भिसे, भानुदास काटे पाटील, शंकर आण्णा काटे, दत्तोबा काटे, शेखर भाऊ कुटे, प्रकाशभाऊ झिंजुर्डे, पोपट काटे, कुंभार सर, विशाल शिंदे, राहुल सरोदे, विकास काटे, संजयशेठ भिसे, प्रविण कुंजीर, गणेश झिंजुर्डे, नितीन कुंजीर, अमोल थोरात, दिपक गांगुर्डे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.