पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी प्रचारार्थ पदयात्रेद्वारे उरण परिसर पिंजून काढला. उरण मधील एलिफेंटा केव्हज येथील नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला.
यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रशांत पाटील, मनसेचे संदेश ठाकूर, मेघनाथ तांडेल, मनसे तालुकाध्यक्ष अभिजित कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज भगत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पार्थ पवार हे प्रत्यक्ष आल्याचे पाहून नागरिक समाधान व्यक्त करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पार्थ पवार यांनी उरण परिसरात जोरदार प्रचार करीत प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. उरण मधील प्रत्येक घर पिंजून काढत नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत उरण मधील सर्व कार्यकर्ते, महिला, तरुण सहभागी झाले होते.





















Join Our Whatsapp Group