पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज बारामतीमधील काटेवाडी भागात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मावळच्या प्रचारातून वेळ काढून बारामतीला जात पार्थ यांनी आज मतदान केले.
महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक आज होत आहे. बारामती मधून पार्थ पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात महायुतीच्या कांचन कुल यांनी तगडे आव्हान दिले आहे. पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढवीत आहेत. परंतु त्यांचे मतदान बारामती लोकसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांनी आज सकाळी बारामती मध्ये जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
मतदानानंतर बोलताना पार्थ पवार म्हणाले की, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीला चांगले वातावरण आहे. सुप्रियाताई मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील असा मला विश्वास आहे. मावळ लोकसभा मतदार संघात पवार कुटुंबातील सर्व सदस्य प्रचारात उतरले नाहीत. राज्यभरातील सर्वच उमेदवारांचा पवार कुटुंबाकडून प्रचार सुरू आहे. मावळ मतदार संघ देखील वातावरण चांगले आहे. विरोधक शुल्लक कारणांवरून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या दृष्टीने मी तगडा उमेदवार असल्यानेच मला लक्ष केले जात आहे मावळमधून आपण एक लाखाच्या मताधिक्क्याने निवडून येऊन असा विश्वासही पार्थ पवार यांनी यावेळी व्यक्त केला.






















Join Our Whatsapp Group