अहमदनगर (Pclive7.com):- छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश सरचिटणीस अनिलदादा राऊत व मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर पा. बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील राजेभोसले यांच्या हस्ते आज दि.०२ मार्च २०२० रोजी पैठण येथे शिवश्री तुषार पांडुरंग फासे यांची शेवगाव युवा तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात, सामाजिक कार्यात, तुषार पांडुरंग फासे यांनी अत्यंत हरहुन्नरी व मोलाचे कार्य केले आहे. त्याचीच दखल वरिष्ठ पातळीवर घेत आज फासे यांची युवक तालुकाध्यक्ष पदी निवड केलेली आहे.
यावेळी उपस्थित गणेश गरड, धीरज बचाटे, सतीश राऊत, आकाश संत, सचिन देवघरे,किशोर देवघरे आदींची उपस्थिती होती. या निवडी बदल माजी आमदार चंद्रशेखरभाऊ घुले पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले पाटील पंचायत समिती सभापती डॉ.क्षितिज भैय्यासाहेब घुले पाटील माजी उपसभापती शिवाजी नेमाने या सर्वांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीचा शुभेच्छा दिल्या.






















Join Our Whatsapp Group