पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये कालपासून एक तरूणीच्या लहानश्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पिंपरी चिंचडवड येथील वाकडमधील असल्याचे म्हटलं जात आहे. या व्हिडिओमधील तरूणीला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र महादेव मंदिराच्या दारासमोरच अॅक्टीव्हा गाडी अती रेस केल्याने ही तरूणी थेट मंदिराच्या पायऱ्यांवरुन दुचाकीसहीत सभामंडपात प्रवेश करुन नंदीसमोर अगदी लोटांगण घालताना दिसत आहे.
याबाबत माहिती घेतली असता पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात महादेवनगर आहे. या परिसरामध्ये काल सकाळी संबंधित तरूणी आली होती. मंदीरासमोर तिने तिची दुचाकी उभी केली होती. तेथून जाताना त्या तरूणीने मंदिरासमोर दुचाकी सुरू केली. मात्र दुचाकी सुरु केल्यानंतर तिने एक्सिलेटर रेस केली आणि काही समजायच्या आत तरूणी दुचाकीसह मंदिरामध्ये शिरली. महादेव मंदिरामधील नंदीच्या समोरच दुचाकीसह तरूणीने अक्षरश: लोटांगणचे घातले असल्याचे मंदिरात बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. सुदैवाने या तरूणीला या अपघातात कोणतीही गंभीर इजा झाली नाही. त्यानंतर तरूणीने लगेच दुचाकी उचलून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती. तो पर्यंत शेजारील महिला आणि मुले तिच्या मदतीला आल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.






















Join Our Whatsapp Group