पिंपरी (Pclive7.com):- ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे यांच्या एकसष्ठीनिमित्त पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते व कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात गुरूवार दि.१२ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मानव कांबळे नागरी सत्कार समिती पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत गजानन खातू, स्वराज अभियान महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव साने, सर्वहारा जनआंदोलनाच्या वतीने उल्का महाजन, एस.एम.जोशी फाऊंडेशनचे विश्वस्त सुभाष वादी, कामगार नेते अजित अभ्यंकर, जन आंदोलनाच्या नेत्या अँडव्होकेट सुरेखा दळवी, कामगार नेते दिलीप पवार, किशोर ढोकले, डॉ. कैलास कदम, यशवंत भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मानव कांबळे यांच्या संघर्षशील जीवनावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन संपन्न होणार आहे. तरी शहरातील सर्व कामगार, कष्टकरी, नागरिक, सामाजिक संघटना व संस्था यांच्यावतीने त्यांच्या सामाजिक कार्याचा बहुमान म्हणून त्यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.






















Join Our Whatsapp Group