पिंपरी (Pclive7.com):- स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकता सोशल फाऊंडेशन व पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनतर्फे पिंपरी चिंचवड शहरातील महिला पोलीस, डॉक्टर, व गृहिणी यांना श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी एकता सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अक्षयभाऊ शिंदे, कृष्णा गायकवाड, गणेश नाईकनवरे, आकाश दौंडगव, तुकाराम सुरवसे,सखाराम सुरवसे, गणेश मानवतकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. एकता सोशल फाऊंडेशन व पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनतर्फे चिंचवड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल, तसेच यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमधील महिला डॉक्टर, आरटीओमधील महिला अधिकारी, गृहिणी तसेच सफाई महिला कामगारांचा आज सन्मान करण्यात आला.






















Join Our Whatsapp Group