पिंपरी (Pclive7.com):- जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवडच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये महिलांचे जंगी स्वागत करण्यात आले. शाळेत महिलांमध्ये महिला दिनाचा उत्साह ओसंडून वाहत होता. विशेषत: सोशल नेटवर्क साईट्सने यात आणखी भर घातली. दिवसभर महिला दिनाच्या डिजिटल शुभेच्छा सोशल नेटवर्क साईट्सहून दिल्या जात होत्या. महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांच्या मजेदार खेळ व विविध स्पर्धेच्या आयोजन केले होते. कोरोना या संसर्ग रोगाने थैमान घातले आसून याचा प्रादुर्भाव समाजामध्ये पसरू नये म्हणून यंदा महिलांनी होळी न खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. जोखमीच्या कामांसह आज सर्वच क्षेत्रांत महिला आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवीत आहेत. मात्र नोकरी, व्यवसायासह कौटुंबिक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळतांना महिलांनी आरोग्याबाबत अधिक जागरूक राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शहनाज कोटार यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला उपप्राचार्य अर्चना करंडे, मनिषा घोसर्वावडे, नाशिता शेख, पुजा लोबो, प्रणाली चौधरी, दीप्ती लगड, वैशाली रांसुबे, माधुरी राणे, स्मिता घागरे, स्मिता पवार आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.






















Join Our Whatsapp Group