पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आलेत. परंतू पिंपरी युवासेना व दक्षता फाऊंडेशनच्या वतीने महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. शहरातील महिला सफाई कामगारांचा गौरव करून खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करण्यात आला.
आपले पिंपरी चिंचवड शहर आज स्वच्छतेच्या बाबतीत देशात अग्रस्थानी आहे. शहरात सर्वत्र असलेली स्वच्छता आणि त्यामुळे शहराला मिळालेली ओळख हे सर्व सफाई कामगारांच्या कार्यामुळेच शक्य झाले आहे. शहरात आरोग्यदायी वातावरण निर्माण करून शहरवासियांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्वाचे कार्य सफाई कामगारांमार्फत केले जाते. शहराला स्वच्छ करण्याचे महत्वाचे कार्य सफाई कामगारांतर्फे केले जाते. वर्षभर शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई महिला कामगारांचा आज महिला दिनानिमित्त गौरव करण्यात आला.
यावेळी कैलास लांडे, अंकुश जाधव, कैलास गायकवाड, मैत्री ग्रुपचे रवीभाऊ कांबळे, जितेंद्र चव्हाण, गोरख नेटके, विनोद लोहिरे, अविनाश जाधव, रोहित गोरे, ज्ञानेश्वर मते, नाझिया बेग, विजेता चव्हाण, ज्योती पाटील, शीतल पवार उपस्थित होते. कार्यक्रमचे आयोजन युवासेना विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला बचतगटाच्या शीला जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ काची यांनी केले होते.






















Join Our Whatsapp Group