पिंपरी (Pclive7.com):- जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मधील संदीप वाघेरे युवा मंच व स्मॉल इक्विटास फायनान्स बँक लि.यांचे संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबीर तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रभागातील अनेक महिलांनी सहभाग नोंदविला.
यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे, स्मॉल इक्विटास फायनान्स बँक लि.चे संग्राम पाटील, माधुरी मुसळे, पोलिस मित्र संघटनेच्या अध्यक्षा अनिता भिसे, समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन रंजना जाधव, आरती निगडे, गणेश मंजाळ, मयुर कचरे यांनी केले. पोलिस मित्र संघटनेच्या अध्यक्षा अनिता भिसे, समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे यांचा तसेच उपस्थित सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला.
शारदाताई मुंडे यांनी यावेळी आपल्या भाषणात बोलताना त्यांना जाणवलेला स्त्रीत्वाचा अर्थ, स्त्री म्हणून त्यांनी अनुभवलेला जगण्याचा अर्थ आणि सर्वच क्षेत्रातल्या आजच्या स्त्रियांच्या भरारीविषयी महिलांना सांगत आपल्या समोरील अनेक अडचणींना हसत सामोरे जाऊन आपले ध्येय साध्य करण्याची प्रेरणा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.






















Join Our Whatsapp Group