मावळ (Pclive7.com):- मावळ तालुक्यात डोणे गावात नुकतीच ‘डोणे प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत शिवनेरी ट्रेकर्स संघाने दणदणीत विजय मिळवला.

डोणे प्रिमिअर लीगच्या माध्यमातून DPL-2020 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ५ संघांनी सहभाग घेतला होता. यात शिवनेरी ट्रेकर्स, रायगड वॉरियर्स, लोहगड ट्रेकर्स, सिंहगड ट्रेकर्स हे संघ सहभागी झाले होते. शिवनेरी ट्रेकर्स विरूध्द रायगड वॉरियर्स या संघामध्ये अंतिम लढत झाली. यात शिवनेरी ट्रेकर्स संघाने प्रथम फलंदाजी करत ४ षटकात ४५ धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना रायगड वॉरियर्सला केवळ ३५ धावांवर करता आल्या, त्याचे सर्व फलंदाज बाद झाल्याने शिवनेरी ट्रेकर्स विजयी झाले.
यास्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान लहु वाडेकर यांना मिळाला. तर मॅन ऑफ द मॅचचे मानकरी अर्जुन खिलारी हे ठरले. तसेच बेस्ट बॅट्समन योगेश कारके यांना आणि बेस्ट बॉलरचे पारितोषिक विश्वास चांदेकर यांना मिळाले. स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभास पाचही संघाचे संघमालक उपस्थित होते. चंद्रकांत चांदेकर, सरपंच शिवलिंग कुंभार, उपसरपंच पोपट वाडेकर, युवा उद्योजक किरण काळभोर, गणेश घारे, विशाल घारे, काळुराम घारे, संतोष कारके आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी सुञसंचालन संस्थापक बाळासाहेब घारे यांनी केले.






















Join Our Whatsapp Group