पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गटातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये कवाडे गटाचे कार्यध्यक्ष रोहित ताटे, संघटक विलास लोंढे, तर बहुजन वंचित आघाडीचे शीलवान इंगळे, शुभम निखाडे, कार्तिक कुंभार आणि शुभम काळे या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश खराळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षकार्यालयात पार पडला. यावेळी या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते फजल शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, विधानसभा निवडणूक २०१९ आधी राज्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी पक्षाला राम राम करत भाजप आणि इतर पक्षात प्रवेश केला होता. मात्र यानंतर आता गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग चालू आहे. जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड यांसारख्या बड्या नेत्यांनंतर आता स्थानिक पातळीवरील नेत्यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात राज्यात राष्ट्रवादीत प्रवेश होत आहेत. आगामी निवडणुकीत पिंपरी चिंचवड महापालिकेत नक्कीच निर्विवाद सत्ता राष्ट्रवादीला मिळणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत शहरातील बड्या नेत्यांचे तसेच अनेक आजी-माजी नगरसेवकाचे प्रवेश देखील होणार आहेत.
– संजोग वाघेरे पाटील – शहराध्यक्ष, राष्ट्रवादी






















Join Our Whatsapp Group