पिंपरी (Pclive7.com):- लायन्स ऑफ आकुर्डीच्या वतीने रावेत येथील स्नेह सावली वृध्दाश्रमध्ये पाणी शुध्दीकरण यंत्र (वॉटर प्युरिफायर) बसवून देण्यात आले.
यावेळी तांदूळ, तेल, चहा साखर इत्यादी महिनाभर पुरेल असे जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
यावेळी अध्यक्ष विक्रम माने, सचिव अक्षय शहरकर, खजिनदार अर्चना कोळी, स्वाती माने, मेघना महाजन, अर्चना कोळी, अमृत सावंत, वसंत गुजर, अनिल पाटील, राजेंद्र कोळी, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
तसेच डॉक्टर दिनाचे औचित्य साधून डॉ.श्याम शिंदे, डॉ.अदिती सहारे, डॉ. विनायक काळे, डॉ. दिनेश पाटील, डॉ. अविनाश वैद्य यांचा सन्मान करण्यात आला.