पिंपरी (Pclive7.com):- मध्य प्रदेश येथील अट्टल दरोडेखोरांसोबत पिंपरी चिंचवड पोलिसांची झटापट झाली. दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर गाड्या घातल्याने एक पोलिस गंभीर जखमी जखमी झाला आहे. ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास उर्से टोलनाक्यावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश येथील अट्टल गुन्हेगार दोन मोटारीतून महामार्गावर जाणार असल्याची खबर पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी उर्से टोल नाक्यावर सापळा रचला.
दरम्यान सकाळी साडेअकराच्या सुमारास संशयित वाहन टोलनाक्यावरून पुढे सरकत होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाड्या घालण्यास सुरुवात केली.
मात्र, तरी देखील पोलिसांनी जीवाची पर्वा न करता सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच तीन ते चार जण बाजूच्या डोंगरामध्ये पळून गेले आहेत.
घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील सर्व पथके घटनास्थळी दाखल झाले असून अन्य आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर संजय शिंदे हे देखील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.























Join Our Whatsapp Group