पिंपरी (Pclive7.com):- कोरोना नंतर पुन्हा पर्यटन क्षेत्र उभारी घेत आहे. देशांतर्गत किंवा विदेशात पर्यटन करण्याचे नियोजन करत असताना पर्यटक चांगले कॅमेरे नेण्याचे नियोजन करतात पण अपेक्षित छायाचित्रे मिळत नाहीत. यांच्यासाठी देवदत्त फोटोग्राफी अँड स्कुलने ३ तासांचे एक ट्रॅव्हल्स फोटोग्राफी विषयी मार्गदर्शन, फोटो स्लाईड शो चे आयोजन केले आहे. येत्या रविवारी दिनांक ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता हा ‘शो’ वीर सावरकर भवन निगडी प्राधिकरण येथे आयोजित केला आहे.

कॅमेरा लेन्स कोणत्या सोबत असाव्यात, मानजोगा फोटो येण्यासाठी काय कराव. सोबत, राजेशाही राजस्थान, अविस्मरणीय हंपी, ऐतिहासिक वाराणसी, व डोळयांचं पारणं फेडणारा लडाख या अशा कोणत्याही सुंदर ठिकाणी फोटोग्राफी कशी करावी याबद्दल फोटो स्लाईड शो होणार आहे.
प्रवेश विनामूल्य असून मर्यादित प्रवेशा करिता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. अधिक माहितीसाठी 9822946329 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आहावन करण्यात आले आहे.
Tags: ट्रॅव्हल फोटोग्राफी मार्गदर्शनदेवदत्त कशाळीकरदेवदत्त फोटोग्राफीदेवदत्त फोटोग्राफी स्कुलस्लाईड शो






















Join Our Whatsapp Group