पिंपरी (Pclive7.com):- आम आदमी पार्टीचे चिंचवड संपर्क प्रमुख तथा सामाजिक न्याय विगचे अध्यक्ष यशवंत कांबळे यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून पिंपरी चिंचवड शहरात ‘आप’ची लोकप्रियता आणि काम पाहुन राजकीय द्वेषातून हा हल्ला झाल्याचे पार्टीच्यावतीने सांगण्यात येत आहे.

आज (दि.०९) सकाळी पिंपरी येथे वाढत्या महागाई विरोधात आपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या समारोप करून चिंचवड संपर्क प्रमुख आणि शहरातील सामाजिक न्याय विग अध्यक्ष यशवंत कांबळे हे त्यांच्या घरी जात असताना अनोळखी ३ व्यक्तींनी चालत्या गाडीवर त्यांच्या डोक्यावर मागून कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात यशवंत कांबळे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या यशवंत कांबळे यांच्यावर जुनी सांगवी येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे म्हणाले की, गेल्या काही वर्षा पासून यशवंत कांबळे यांचे काम दापोडी, सांगवी परिसरात वाढलं आहे. नागरिक पण आम आदमी पक्षात प्रवेश करत आहेत. त्याच्या कामाला मिळणारा जनतेचा प्रतिसाद पासून राजकीय सूड बुद्धीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. तसेच भोसरी पोलिस या हल्लेखोरांचा शोध लावून योग्य ती कारवाई करतील.
भोसरी संपर्क प्रमुख स्वप्नील जेवळे म्हणाले की, समाजात जी गरिबी, बेरोजगारी वाढली आहे. त्याचा काही राजकीय लोक त्याच्या राजकीय हेतू साठी, पैसे देऊन किंवा नशा देऊन प्राण घातक हल्ले करून घेतले जातात. विचाराची लढाई विचारांनी लढावी. असे हल्ले लोकशाहीत कधीच स्वीकारले जाणार नाहीत. याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि भविष्यात आपच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर असे हल्ले होत राहिले तर पोलिस यंत्रणेच्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल.






















Join Our Whatsapp Group