पिंपरी (Pclive7.com):- इटली येथे होणाऱ्या वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स ‘ग्रॅण्ड प्रिक्स इटालियन ओपन २०२२’ स्पर्धेसाठी साई स्पोर्टस् अकॅडमीच्या दत्ता वरकड याची निवड करण्यात आली आहे.

इटली येथे ही स्पर्धा दि.२ मे ते मे २०२२ मध्ये होणार आहे. पिंपरी चिंचवड मधील साई स्पोर्टस् अकॅडमी मधील दत्ता वरकड या पॅरा खेळाडूची १०० मीटर धावणे व लांब उडी या क्रीडा प्रकारात निवड झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील माजी राष्ट्रीय विजेते खेळाडू व पिंपरी-चिंचवड शहर अॅथलेटिक्स संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष रामदास कुदळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव चंद्रशेखर कुदळे, खजिनदार मनीषा जाधव, उपाध्यक्ष रुस्तुम पठाण, संजय सातव, मंगेश पवार व उमेश जाधव यांनी दत्ता वरकड याचा सत्कार करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
हा पॅरा खेळाडू चंद्रशेखर कुदळे, रुस्तुम पठाण व मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर येथे सराव करीत आहे. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी केदारी मॅडम यांचे त्याला मोलाचे सहकार्य लाभले.
Tags: अॅथलेटिक्स संघटनाइटलीउमेश जाधवचंद्रकांत पाटीलचंद्रशेखर कुदळेदत्ता वरकडपिंपरी चिंचवडमंगेश पवारमनीषा जाधवरामदास कुदळेरुस्तुम पठाणवर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स ग्रॅण्ड प्रिक्स 'इटालियन ओपन २०२२'संजय सातवसाई स्पोर्टस् अकॅडमी





















Join Our Whatsapp Group