पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथील श्री लक्ष्मण नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला असून, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी याबाबतची घोषणा केली.

पतसंस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जगताप होते. यावेळी जेष्ठ सभासद चंद्रकांत लिमकर, उत्तम गीते, रमाकांत बहिरट, साहेबराव आढाव, अनिल आहेर यांच्यासह सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.
प्रास्ताविक महादेव रोकडे यांनी केले. संस्थेचे सचिव प्रा. सुरेश धाडीवाल यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. सुनील कदम यांनी आभार मानले.






















Join Our Whatsapp Group