पिंपरी (Pclive7.com):- जागतिक महिला दिनानिमित्त नाना काटे सोशल फाउंडेशन व चंद्रनील सोशल फाउंडेशन यांच्या वतीने समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणा-या कर्तबगार महिलांचा नगरसेविका शितल काटे व नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सत्कारमुर्ती डॉ.पल्लवी प्रसाद यांनी मिसेस टीअरा इंडिया २०१८ च्या स्पर्धेच्या मानकरी आहेत. अॅड.अनुराधा शिंदे या व्यवसायाने मुंबई उच्च न्यायालय येथे वकील आहेंत.तसेच त्यांना मिसेस इंडिया इंटरनॅशनल क्वीन -२०१७ हा बहुमान मिळाला आहे.
मिसेस रज्जी अजवाणी सेंटर फॉर पॉलीसी स्टडीज,आय आय टी बॉम्बे येथे डॉक्टरेटचे पदवीधर आहेत.यांनी बंकिंग,माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार,मायक्रोफायनान्स मध्ये काम केले आहे. अजवाणी यांना सात भाषा अवगत आहेत.त्यांना अमेरिका मधील १८ वर्षाचा कामाचा अनुभव आहे.या कर्तबगार महिला प्रमुख पाहुणे म्हणून व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. या महिलांचा तसेच पत्रकारितामध्ये कार्यरत असलेल्या सकाळ वृत्तपत्राच्या वैशाली भुते, इंडियन एक्सप्रेसच्या अंजली मरर, पुढारी वृत्तपत्राच्या पूनम पाटील, जनशक्ती वृत्तपत्राच्या मनिषा थोरात, एम.पी.सी.न्यूज पोर्टलच्या लिना माने, माय पुणे पल्सच्या मधुबनी यांचा नाना काटे सोशल फाउंडेशन व चंद्रनील सोशल फाउंडेशन यांच्या वतीने तसेच मंजुश्री बंदपट्टे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या सर्व महिलांचे आभार शर्वरी जळमकर यांनी मानले.






















Join Our Whatsapp Group