पौड (Pclive7.com):- पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने एक्सवर याची माहिती दिली आहे.

दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून हेलिकॉप्टरमधील वैमानिकासह तीनही प्रवाशी सुखरुप असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे.

सदर हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादच्या दिशेला जात होते. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये चार लोक प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group