पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित गणेशोत्सव सजावट स्पर्धेत धार्मिक गटात जय बजरंग मित्र मंडळ निगडी (काली मातेचा महिमा), जिवंत देखावे गटात दक्षता तरुण मंडळ रुपीनगर तळवडे (हेची दान देगा मानवा, अवयव दान) व राष्ट्रतेज मित्र मंडळ नेहरूनगर (मोबाईल शाप कि वरदान) या मंडळानी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे.
गणेशोत्सव स्पर्धा परीक्षण समितीचे सदस्य जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, कलाशिक्षक श्रावण जाधव व पुरुषोत्तम शेलार यांनी स्पर्धेचा निकाल महापौर नितीन काळजे यांचेकडे बंद पाकिटात सुपूर्द केला. महापौरानी लगेचच पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केला. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत ६५ मंडळानी भाग घेतला. यापैकी ३८ मंडळे बक्षीसपात्र ठरली. त्यांना ५ लाख ५० हजार रुपयांची बक्षिसे जाहीर झाली आहेत.
स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे-
धार्मिक देखावे- प्रथम क्रमांक-जय बजरंग मित्र मंडळ, निगडी (काली मातेचा महिमा), द्वितीय- पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळ, भोसरी (श्रीकृष्णाचा जन्म), तृतीय- भारत माता तरुण मंडळ- खराळवाडी (संकट मोचन हनुमान), चौथा विभागून- उत्कृष्ट तरुण मंडळ, चिंचवड (जागरण गोंधळ), श्रीराम मित्र मंडळ, भोसरी (कथा दत्त जन्माची), पाचवा विभागून- डी वार्ड फ्रेंड सर्कल (भक्ती महल), छत्रपती श्री शिवाजी तरुण मंडळ, पिंपळे गुरव (संत तुकाराम महाराजांचा भक्तीचा मळा),
उत्तेजनार्थ- नव महाराष्ट्र तरुण मंडळ भोसरी, हनुमान मित्र मंडळ चिंचवड स्टेशन, शिवाजी उदय मंडळ चिंचवड, कै.दामुशेठ गव्हाणे मित्र मंडळ भोसरी, विशेष उत्तेजनार्थ – जय बजरंग मित्र मंडळ आहेरवाडी चिखली, श्री दत्त तरुण मंडळ दत्तवाडी आकुर्डी.
जिवंत देखावे-प्रथम क्रमांक- दक्षता तरुण मंडळ, रुपीनगर, तळवडे (हेची दान देगा मानवा, अवयव दान), द्वितीय- राष्ट्रतेज तरुण मंडळ काळभोर नगर (लोकहो तुम्हाला सिस्टीमवर भरोसा नाय का), तृतीय- श्री नागेश्वर मित्र मंडळ, आकुर्डी (लाल महालातील शिव तांडव), चौथा विभागून एस.के.एफ.इंडिया लिमिटेड गणेशोत्सव मित्र मंडळ चिंचवड (स्त्री शक्ती ही राष्ट्रशक्ती), सिंधू नगर युवक मित्र मंडळ प्राधिकरण (घडलंय बिघडलंय), पाचवा विभागून- गांधीपेठ तालीम मित्र मंडळ चिंचवड (कर्तव्यदक्ष श्रेष्ठ सैनिक), श्री हनुमान व्यायाम मंडळ चिखली (गाव अपशिंगे).
उत्तेजनार्थ – वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल साने चौक चिखली, शिव शक्ती मित्र मंडळ आकुर्डी, जाणता राजा ग्रुप कासारवाडी, त्रिमूर्ती मित्र मंडळ रामनगर चिंचवड, विशेष उत्तेजनार्थ- सम्राट मित्र मंडळ थेरगाव, अमरदीप मित्र मंडळ पिंपरी गाव.
समाजप्रबोधनपर देखावे-प्रथम क्रमांक- राष्ट्रतेज मित्र मंडळ नेहरूनगर (मोबाईल शाप कि वरदान), द्वितीय- श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ आकुर्डी (आमच्यावर भरोसा नाय काय), तृतीय हनुमान तरुण मंडळ चिंचवड (धरानियमांची कास करा सुरक्षित प्रवास), चौथा विभागून- संत सावतामाळी तरुण मंडळ जाधववाडी चिखली (मातृपितृ सेवा हिच ईश्वरसेवा), लांडगे लिंबाची तालीम मंडळ, भोसरी (शिवशाहीचा हाच शिरस्ता), पाचवा विभागून- श्री लक्ष्मीनगर सार्वजनिक मित्र मंडळ चिंचवड (व्यथा भारतमातेची, अंधश्रधा पर्यावरण), सिद्धिविनायक प्रतिष्ठान (आरोग्यम धनसंपदा)
उत्तेजनार्थ-जिव्हाळा सामाजिक संस्था हिंदवी स्वराज युवा मंच आहेरवाडी चिखली, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ जाधववाडी चिखली, स्वराज्य प्रतिष्ठान पिंपरी गाव, संत नगर मित्र मंडळ मोशी प्राधिकरण, नवयुग मित्र मंडळ रुपीनगर निगडी.