पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त सहशहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे (वय ५९) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने महापालिकेच्या प्रशासन व अभियंता वर्गात शोककळा पसरली आहे.
डॉ. जुंधारे यांना सेवानिवृत्तीनंतर मधुमेहाचा त्रास सुरू झाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मुळचे प्रवरानगर तालुक्यातील कोळपेवाडी (जिल्हा अहिल्यानगर) येथील असलेल्या डॉ. जुंधारे यांचा अंत्यविधी आज (मंगळवारी) सकाळी त्यांच्या मूळगावी कोळपेवाडी येथे पार पडणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. अत्यंत नम्र, अभ्यासू आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून डॉ. जुंधारे यांची ओळख होती.























Join Our Whatsapp Group