पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल महिन्याच्या चौथ्या आठवड्यात आज (दि.२२) रोजी चिंचवडमध्ये पारा ४१.१ अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला. त्यामुळे दुपारी शहरातील रस्त्यांवर काही प्रमाणात शुकशुकाट दिसत होता. तापमानात वाढ झाल्याने थंड पेयांची मागणी वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे विविध आजारांचे प्रमाणही वाढले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील तापमानात वाढ झाल्याने थंड पेयांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विविध फळांच्या ज्यूसला व उसाच्या रसाला नागरीकरांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. थंड ताकाला मोठी मागणी आहे. ताकाच्या गाड्या चौकाचौकात उभ्या राहू लागल्या आहेत. उन्हाची लाही वाढत असल्याने टोप्या व गॉगल्सची मागणी वाढत आहे.

उष्माघात टाळा..
शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे, तसेच फळांचा आहार घ्यावा. प्रमाणापेक्षा तापमान वाढल्यास रुग्णाला तातडीने सावलीत न्यावे. उष्माघाताने चक्कर येणे, मळमळ होणे, रक्तदाब कमी होणे, तसेच बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसतात. अशा परिस्थितीत रुग्णाला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे.
























Join Our Whatsapp Group