पिंपरी (Pclive7.com):- महिलेने शरीरसंबंधाचे आमिष दाखवून तरुणाला तब्बल ५४ लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार निगडी येथे उघडकीस आला आहे. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी जहीर युसूफ शिकलगार (३०, रा. यमुनानगर, निगडी) याच्या मोबाईलवर फोन करून ओळख वाढवली. तिने शरीरसंबंध ठेवायला तयार असल्याचे आमिष दाखवून तसेच वडिलांच्या कॅन्सरचा बहाणा करून जहीरकडून पैसे उकळले. महिलेच्या भूलथापांना बळी पडलेल्या जहीरने महिलेला वेळोवेळी पेटीएम, फोन-पे, मोबी क्विक, एसबीआय व्हॅलेट आणि बँकेच्या खात्यातून आयएमपीएस करून एकूण ५३ लाख ६५ हजार रुपये हस्तांतरित केले. पैसे मिळाल्यानंतर महिलेने फोनवर बोलणे कमी केले. जहीरने पैशाची मागणी केल्यानंतर महिलेने पैसे परत न देता त्याची फसवणूक केली. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.
या प्रकरणी जहीरने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून एका अनोळखी महिलेसह तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.






















Join Our Whatsapp Group