पिंपरी (Pclive7.com):- किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तीन जणांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री ११ वाजता थेरगाव येथे घडली. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

गौरव ऊर्फ नन्या गौतम वाघमारे (वय २२), रितेश क्षीरसागर (वय २१) असे अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सौरभ विलास चौधरी (वय २४, सुरक्षारक्षक, रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ चौधरी आणि त्यांचे मित्र गप्पा मारत उभे असताना आरोपी गौरव ऊर्फ नन्या गौतम वाघमारे, रितेश क्षीरसागर आणि त्यांच्या साथीदाराने तेथे येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी कोयत्याने डोक्यावर आणि हातावर वार करून फिर्यादीला गंभीर जखमी केले.

हल्ल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करत आम्हाला कोणी अडवू शकत नाही, अशी धमकी दिली. काळेवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. या घटनेमुळे थेरगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.




















Join Our Whatsapp Group