रावेत (Pclive7.com):- रावेत येथील बीआरटी बस स्टॉपजवळ पाईपलाईन फुटल्याची घटना घडली आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.

पाईपलाईन नेमकी कोणत्या कारणामुळे फुटली, तसेच दुरुस्तीचे काम कधी पूर्ण होणार, याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. परंतु एकीकडे शहरात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई भेडसावत असताना अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.



















Join Our Whatsapp Group