काळेवाडी (Pclive7.com):- जिल्हा क्रीडा परिषद, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या आट्यापाट्या स्पर्धेत एम. एम. वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, काळेवाडीच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, जिद्द आणि कौशल्याचे प्रदर्शन करत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या यशाबद्दल मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष मा. भाऊसाहेब जाधव सर, महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. पद्मावती जट्टे मॅडम, क्रीडा शिक्षक रामेश्वर हराळे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले.

खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल महाविद्यालय परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.


















Join Our Whatsapp Group