पिंपरी (Pclive7.com):- भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या जाहिर सत्काराच्या कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी पैसे देऊन महिला बोलविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृहात कार्यक्रम संपल्यानंतर आणलेल्या महिलांना भाजप कार्यकर्ता प्रत्येकी महिलेला ५०० रूपये वाटप करत असताना प्रसारमाध्यमांनी रंगेहात पकडले आहे.

पैसे वाटताना सापडल्यानंतर भाजपचा कार्यकर्ता गोंधळून गेला. बोलविलेल्या महिलांना नाष्ट्यासाठी पैसे दिल्याची सारवासारव त्याने केली. त्यानंतर त्याने तातडीने ही बातमी प्रसारीत करू नये यासाठी भाजपच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना बोलवून प्रसार माध्यमांवर दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला.
शहरात सध्या भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. एक खासदार, दोन आमदार, मंत्री दर्जाची तीन पदे, तर महापालिकेत तब्बल ८२ एवढे नगरसेवकांचे संख्याबळ आहे. तरी देखील पक्षाचा जाहिर कार्यक्रम होत असताना गर्दी जमविता येत नसल्याचे या पैसे वाटपावरून समोर आले आहे.






















Join Our Whatsapp Group