पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये आज रावसाहेब दानवे यांचा शहर भाजपच्या वतीने जाहीर सत्कार झाला. पण या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीचे सभापतीच ‘स्टँडिंग’ मध्ये असल्याचे दिसून आल्याने भाजपात ‘प्रोटोकॉल’ची कसा पायदळी तुडवला जातो याचा प्रत्यय आला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. तसेच माजी पालकमंत्री गिरीश बापट हे पुणे लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून संसदेत गेले आहेत. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहर भाजपतर्फे आज तीनही मान्यवरांचा सत्कार संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृहात झाला.
या कार्यक्रमासाठी स्टेजवर अनेक खुर्च्या ठेवल्या होत्या. काही नगरसेवकही त्यावर बसलेले होते. जसेजसे मान्यवर सभागृहावर येत होते, तसे जणू संगीत खुर्चीच चालली आहे की काय..? असा सवाल उपस्थितांमध्ये होत होता. या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी सभापती विलास मडिगेरी यांनी साधी बसायला खुर्ची देण्याची ही तसदी ही कुणी घेतली नाही. तसेच आयोजकांनीही याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याचे पहायला मिळाले. हा संपूर्ण कार्यक्रम विलास मडिगेरी ‘स्टँडिंग’मध्ये अर्थात उभे राहून होते. त्यामुळे सर्वांत श्रीमंत असलेल्या महापालिकेचा, तसेच ‘प्रोटोकॉल’ पाळला जाणाऱ्या पक्षात स्थायी समिती सभापतींचा अवमान झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.






















Join Our Whatsapp Group