पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती जेष्ठनेते भाईजान काझी यांचे आज (दि.१२) अल्पशा आजाराने निधन झाले, ते ७० वर्षाचे होते. शहरातील ज्येष्ठनेते आझमभाई पानसरे यांचे ते सख्खे मेहुणे होते.
भाईजान काझी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सरचिटणीस होते. पिंपरी चिंचवड एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त, पुणे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त देखील ते होते. शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे काम होते. महाराष्ट्र राज्य हज यात्रा कमिटीचे मागील २० वर्षांपासून ते उपाध्यक्ष होते.
मागील तीन दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. ईदगाह मैदान चापेकर चौक चिंचवड येथील दफनभूमीत आज सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.






















Join Our Whatsapp Group