पिंपरी (Pclive7.com):- मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने पिंपरी येथील शगून चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या हस्ते महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला शहर संघटिका उर्मिलाताई काळभोर, सरिताताई साने, उपजिल्हा संघटिका स्वरूपाताई खापेकर, अनिताताई तुतारे, शिल्पा आनपण, शैलाताई सातपुते, वैशाली कुलथे, राजेश वाबळे, गुलाब गरूड, माधव मुळे, खंडू शिरसाठ, नितीन घोलप, राजू आवळे तसेच शहरातील सर्व शिवसैनिक, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जयंती सोहळ्याचे आयोजन मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांनी केले होते.
यावेळी संयोजक गोरख पाटील, रविकिरण घटकार, प्रदिप दळवी, दत्ता गिरी, आधिकराव भोसले, नवनाथ जाधव, गणेश पाडुळे, बाळासाहेब गायकवाड, अंकूश कोळेकर, निलेश भोरे, मारुती म्हस्के, नरसिंग माने, भरत इंगळे, जितेंद्र चौधरी, गणेश वाळूंज, दिपक भक्त, अक्षय घटकार, किरण अडागळे, अमित आहेर, राहूल कदम, सचिन छपरीबंद आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group